राहुल द्रविडचा नवा विक्रम : गाठला 11 हजार रन्सचा टप्पा

November 16, 2009 1:26 PM0 commentsViews: 1

16 नोव्हेंबर भारतीय टीममधला मिस्टर कूल बॅट्समन राहुल द्रविडने सोमवारी टेस्ट क्रिकेटमध्ये अकरा हजार रन्सचा टप्पा पार केला. अहमदाबाद टेस्टमध्ये टीमला गरज असताना त्याने दणदणीत सेंच्युरी ठोकली. त्याचबरोबर आपल्या कारकीर्दीतला महत्त्वाचा असा माईलस्टोन त्याने गाठला. अकरा हजार रन्सचा टप्पा गाठणारा सचिन तेंडुलकर नंतर तो दुसरा भारतीय बॅट्समन ठरलाय. 135व्या टेस्टमध्ये त्याने ही मजल मारली. टेस्टमध्ये द्रविडने 53च्या ऍव्हरेजने रन्स केले. सर्वात जास्त रन्स करणार्‍या बॅट्समनच्या यादीत द्रविड पाचव्या क्रमांकावर आहे.

close