शिवसेना आमदार आणि उद्योगपती फिरोदिया यांच्यात हाणामारी

November 16, 2009 1:59 PM0 commentsViews: 4

16 नोव्हेंबर कायनेटीक कंपनीच्या कामगारांच्या वादावरुन कायनेटीक अध्यक्ष अरुण फिरोदीया आणि नगरचे आमदार अनिल राठोड यांच्यात हाणामारी झाली. दोघानींही एकमेकांविरुध्द कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. कंपनीच्या मॅनेजमेंटने 46 कामगारांना कामावरून काढून टाकल्याचा जाब विचारण्यासाठी आपण गेल्याचं शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांनी म्हटलं आहे. तर कंपनीच्या मॅनेजमेंटने कोणालाही कामावरून काढलं नसल्याचं उद्योगपती अरुण फिरोदिया यांनी सांगितलंय. 46 कामकारांना कामावरून काढून टाकल्याच्या मुद्यावरून या दोघांमध्ये हा हाणामारीचा प्रकार घडला.

close