मालवणी दारूकांडातील मृतांच्या नातेवाईकांना 1 लाख रूपयांची मदत

June 21, 2015 8:53 PM0 commentsViews:

malvani help tawade7521 जून : मालाड मालवणी मधील विषारी दारूकांडातील मृतांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात येईल अशी घोषणा उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली.

मालवणीमधील विषारी दारूकांडात बळी पडलेल्या मृतांच्या कुटुबीयांची तावडे यांनी अली तलाव गावदेवी मंदिर, लक्ष्मीनगर आदी भागात जावून त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. मृत कुटुंबीयांचे त्यांनी सांत्वन केलं. या विषारी दारुकांडाला जबाबदार असलेल्या दोषींविरूद्ध कडक कारवाई करण्याची आग्रही मागणी मृतांच्या कुटुंबीयांनी तावडे यांच्याकडे केली.

या संदर्भात कोणत्याही दोषीला पाठीशी घातले जाणार नाही, पोलीस अधिकारी, उत्पादन शुक्ल अधिकारी आणि अजून कोणीही दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, असं आश्वासन तावडे यांनी दिलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close