योगावरुन राजकारण करू नये -अण्णा हजारे

June 21, 2015 10:20 PM0 commentsViews:

21 जून : जगभरात योगदिन उत्साहात साजरा होत असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी ही आज राळेगणसिद्धीमध्ये योगा केला. यादवबाबा मंदिराच्या हॉलमध्ये अण्णांनी योगासनं केली. यावेळी त्यांनी योग हा शरीरासाठी आवश्यक आहे. तो सर्वांनीच केला पाहिजे. शैक्षणिक अभ्यासक्रमात ऐच्छिक विषय म्हणून योगाचा समावेश करण्याची मागणीही त्यांनी केलीय. तसंच योगावरुन राजकारण करू नये, असा सल्लाही अण्णांनी दिलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close