मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

November 16, 2009 2:01 PM0 commentsViews: 2

16 नोव्हेंबर भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ज्या गावामध्ये मुख्यमंत्र्यांना अधिक मताधिक्य मिळालं त्यांना पाच लाख रुपये विकासनिधी देवू अशी घोषणा मुख्यमंत्र्यानी दोन दिवसांपूर्वी केली होती. याप्रकरणी मतदारांना लाच दाखवल्याची तक्रार तावडे यांनी दाखल केली आहे. राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

close