छगन भुजबळांच्या पाठी आता ईडीचा फेरा

June 22, 2015 3:11 PM0 commentsViews:

Chagan-Bhujbal22 जून : दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी चौकशी आणि छाप्यांच्या चक्रात अडकलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची झाडाझडती अजूनही सुरूच आहे. ईडीच्या विशेष पथकानं आज भुजबळ यांच्या कंपनी कार्यालाशी संबंधित असलेल्या विविध अधिकार्‍यांच्या घरं आणि कार्यालयांवर छापे टाकले.

राज्यात विविध ठिकाणी ईडीचं हे धाडसत्र सुरू आहे. पंकज आणि समीर भुजबळ यांची इंडोनेशिया येथील कंपनी उभारायला 25 करोड देण्यात आले. त्या संदर्भात या कंपनीच्या अधिकार्‍यांच्या घरी ईडीने छापा टाकला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यात आता कोणती माहिती उघड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी एसीबीने भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मुंबई, नाशिक, पुण्यासह 16 मालमत्तांवर छापे टाकले होते. त्यात भुजबळांकडे कोट्यवधी रूपयांची मालमत्ता असल्याचं समोर आलं होतं. एसीबीच्या छाप्याने भुजबळांच्या अडचणीत वाढ झाली असताना आता ईडीच्या धाडसत्राने भुजबळ आणखी गोत्यात आल्याची चर्चा आहे. या छाप्यातून नेमके काय हाती लागले आहे, ते अद्याप कळू शकलेले नाही.

भुजबळांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप पुन्हा एकदा फेटाळले आहेत. ‘माझ्या असलेल्या संपत्तीचे आकडे फुगवून सांगितले जात आहेत’ असा आरोप त्यांनी एसीबीवर केला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close