नितीन गडकरी भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

November 17, 2009 7:51 AM0 commentsViews: 36

17 नोव्हेंबर नितीन गडकरी यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड निश्चित झालीये. दोन आठवड्यानंतर याबद्दलची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. येत्या दोन आठवड्यात दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. महत्वाचं म्हणजे गडकरींना असलेला पक्षांतर्गत विरोध मावळलाय. त्यामुळं गडकरींच्या नावावर आता शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय.गडकरींची या पदावर निवड निश्चित होण्यामागे प्लस पॉईंट काय आहेत ते पाहुयात : नितीन गडकरींची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक आहे.याशिवाय सरसंघचालक मोहन भागवतांशीही त्यांचे वैयक्तिक संबंध आहेत.गडकरींनी जाणीवपूर्वक आपली स्वच्छ प्रतिमा जपलीय.सार्वजनिक बांधकाममंत्री असताना त्यांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केलीय. गडकरी जाणीवपूर्वक दिल्लीतल्या गटातटाच्या राजकारणापासून आत्तापर्यंत दूर राहिलेत.आता गडकरींमधल्या उणिवांवर एक नजर टाकूयात :गडकरींना राष्ट्रीय राजकारणाचा अनुभव नाही.एकदाही निवडणूक न लढलेल्या गडकरींना निवडणुकीच्या राजकारणाचा अनुभव नाही.पक्षांतर्गत विरोध मावळला असला तरी अडवाणी गटाचा गडकरींना पहिल्यापासून विरोध आहे.गडकरी पक्षाध्यक्ष झाल्यास त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागेल, त्यावर एक नजर टाकूयात…निवडणुकीत पिछेहाट झालेल्या पक्षसंघटनेला पहिल्यांदा मजबूत करावं लागेल.निवडणुकीत हरल्यामुळं निराश झालेल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवावं लागेलअधिकाधिक तरुणांना पक्षाकडं आकर्षित करावं लागेल.काँग्रेसचा वाढता प्रभाव रोखणं हे त्यांच्यासमोरचं प्रमुख आव्हान आहे. भाजपला वैचारिक दिशा देण्यासोबतच मित्रपक्षांना बांधून ठेवण्याची कसरतही त्यांना करावी लागेल.गडकरी उच्चवर्णीय असल्याने बहुजन समाजाशी जोडून घेणं त्यांना अवघड ठरु शकतं.

close