अखेर सरकार लागलं कामाला, 1700 कोटींच्या नव्या पीक कर्जासाठी दिली हमी

June 22, 2015 5:49 PM0 commentsViews:

farming in maha22 जून : राज्यात मान्सून सक्रीय झाल्यानंतर खरिपाच्या पेरणीलाही सुरुवात झालीय. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने नाबार्डच्या अधिकार्‍यांना बोलवून सतराशे कोटी रुपयांच्या पीक कर्जाची हमी दिलीय.

त्यामुळे राज्य सरकारने आता 300 कोटी तर राज्य बँकेने 200 कोटी रुपये देऊन कर्जाच्या पुनर्गठनाची प्रक्रिया सुरू केलीये.

लवकरच नाबार्डचे बाराशे कोटी उपलब्ध होऊन नव्या पीक कर्ज शेतकर्‍यांना उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारने पीक कर्ज पुनर्गठनाचे आदेश दिले होते.

पण, तरीही बँकांनी शेतकर्‍यांना नवं कर्ज द्यायला नकार दिला होता. त्यामुळे ऐन खरिपाच्या तोंडावर पेरणीसाठी शेतकर्‍या ंच्या हातात पैसाच नव्हता.

यावरून सरकारची बरीच नाचक्कीही झाली आणि आता सरकार कामाला लागलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close