अवकाळी पावसाचं फलटण-म्हसवडमध्ये थैमान

November 17, 2009 11:02 AM0 commentsViews: 4

17 नोव्हेंबर अवकाळी पावसाने सातार्‍यातल्या फलटण आणि म्हसवडमध्ये थैमान घातलं आहे. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे म्हसवडमध्ये माण नदीच्या पूरात दोघेजण वाहून गेलेत. त्यात एका लहान मुलाचाही समावेश आहे. तर पाचजणांना वाचवण्यात यश आलंय. वाहून गेलेल्या मुलाचं नाव ओंकार जगताप असं आहे. तो फलटण-दहीवडी रोडवरच्या भाडळे इथल्या ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेला. तर म्हसवडमधल्या पुरात शहाजी चौगुले वाहून गेलेत. म्हसवडमधली अनेक घरं पाण्याखाली गेलीत. मंगळवारी म्हसवडमधल्या सिद्धनाथाची यात्रा आहे. या यात्रेतली दुकानंही पाण्याखाली गेली आहेत. फलटणमध्ये सरकारी यंत्रणेनं बचावकार्य सुरू केलं आहे. मात्र अजून म्हसवडमध्ये आपत्कालीन यंत्रणा पोहोचलेली नाही. त्यामुळे तिथं गावकरीच बचावकार्य सुरु केलंय.

close