26/11 पूर्वी डेव्हिड हेडलीची पुण्यात भेट

November 17, 2009 11:04 AM0 commentsViews: 6

17 नोव्हेंबर अमेरिकेत अटक करण्यात आलेला दहशतवादी डेव्हीड कोलमन हेडली पुण्यातही दोनदा येऊन गेल्याचं पुणे पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. 26/11 च्या हल्ल्याआधी जुन 2008 आणि हल्ल्यानंतरही हेडली पुण्यात येऊन गेला होता. पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातल्या ओशो आश्रमातही तो गेला होता. हेडली प्रकरणाचा तपास करणार्‍या नॅशनल इनव्हेशिटीगेशन एजेन्सीचं (NIA) पथकही नुकतंच पुण्यात येऊन गेल्याची माहिती आहे. हेडलीचे महेश भट्टचा मुलगा राहूल भट्टशी संबंध होते हे उघड झालं आहे. त्याने भारतात कोणकोणत्या ठिकाणांना भेट दिली, याचा तपास एनआयए करत आहे.

close