आझमींची हिंदीतून शपथ : समाजवादी पार्टीने केला सत्कार

November 17, 2009 11:19 AM0 commentsViews: 2

17 नोव्हेंबर समाजवादी पक्षाचे आमदार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांचा मंगळवारी लखनौत पक्षाकडून सत्कार केला. मराठीचा आपण आदर करतो, पण कुणाच्या दबावापुढे झुकून मराठी शिकणार नाही, असं ते म्हणाले. महाराष्ट्राच्या विधिमंडळात हिंदी भाषा आणल्याशिवाय राहणार नाही, असंही आझमी यांनी लखनौमधल्या जाहीर सभेत सांगितलं. अबू आझमी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत हिंदीतून शपथ घेतली होती. त्यानंतर मनसेच्या आमदारांनी त्याच्यावर हल्ला केला होता. याचा आझमींनी सामना केला म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. आझमी यांच्या शपथेवरून 9 नोव्हेंबर रोजी विधानसभेत गोंधळ झाला होता. त्यावरून मनसेच्या 4 आमदारांवर निलंबनाची कारवाईही झाली होती. आझमींनी या सगळ्या प्रकाराला धैर्यानं तोंड दिलं म्हणून पक्षाच्या मुख्यालयात आझमींचा गौरव करण्यात आला. पक्षाध्यक्ष मुलायमसिंग यादव आणि सरचिटणीस अमरसिंग या कार्यक्रमाला उपस्थित होते.

close