हेडलीचा मुक्काम पुण्यातल्या ‘हॉटेल सूर्या व्हिला’मध्ये

November 18, 2009 8:35 AM0 commentsViews: 4

18 नोव्हेंबर डेव्हिड हेडली पुण्यातल्या कोरेगाव पार्कमधल्या ओशो आश्रमात गेल्याचं उघड झालं आहे. पण त्यावेळी तो याच आश्रमाशेजारच्या 'हॉटेल सूर्या व्हिला'मध्ये थांबला होता, असंही आता पोलीस तपासात उघड झालं आहे. हॉटेलच्या रजिस्टरमध्ये त्याबाबतच्या नोंदी आढळल्यात. या हॉटेलकडून पोलिसांना हेडलीच्या पासपोर्टची कॉपीही मिळाली आहे. हेडलीने स्वत:च्या हस्ताक्षरात भरलेला परदेशी नागरिकांसाठीचा 'सी फॉर्म' ही या हॉटेलने पोलिसांकडे सोपवला आहे. हेडलीच्या पासपोर्टवरचा फोटोही पोलिसांना मिळाला आहे. सी फॉर्मवरच्या नोंदीनुसार हेडलीच्या पासपोर्टचा नंबर 097536400 आहे. हा पासपोर्ट त्याला 10 जानेवारी 2006 मध्ये देण्यात आला आहे. हेडली हा पर्यटक नव्हे तर बिझनेसमन असल्याचं रजिस्टरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. रजिस्टरमधल्या नोंदीनुसार 16 मार्च रोजी हेडली या हॉटेलच्या रूम नंबर 202मध्ये राहिला होता.हेडलीसंदर्भातल्या तपासासाठी एफबीआयची टीम भारतातलष्कर-ए-तोयबाशी संबधित अतिरेकी डेव्हिड हेडलीच्या भारतातल्या कनेक्शनची चौकशी करण्यासाठी एफबीआयची टीम बुधवारी भारतात येत आहे. हेडली बर्‍याच वेळा भारतात आला होता. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात तो थांबला होता. यावेळी तो कोणाकोणाला भेटला याची चौकशी एफबीआय करणार आहे. हेडलीचं बॉलीवूड कनेक्शन हेडलीच्या बॉलीवूड कनेक्शनबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. या सगळ्या प्रकारानंतर आता राहुल भट हा हेडली प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार आहे, अशी माहिती मुंबईचे जॉईंट सीपी राकेश मारिया यांनी दिली आहे. याआधी डेव्हिड हेडलीच्या संपर्कात असल्याप्रकरणी राहुल भटची पोलिसांनी चौकशी केली होती. राहुल हा दिग्दर्शक महेश भट यांचा मुलगा आहे.

close