पद्मसिंह पाटील यांचा जामीन अर्ज फेटाळला

November 18, 2009 9:46 AM0 commentsViews: 5

18 नोव्हेंबर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पद्मसिंह पाटील यांचा जामीन अर्ज लातूर सेशन कोर्टाने फेटाळला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या खुनाच्या सुपारी प्रकरणी बुधवारी सुनावणी झाली. याप्रकरणात जामीन मिळावा अशी मागणी पद्मसिंहांनी केली होती. पण, कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणाचा प्राथमिक तपास अजूनही सुरू असल्याने जामीन देता येणार नाही, असं कोर्टानं म्हटलं आहे. त्यामुळे पद्मसिंह पाटील यांना जामीनासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

close