‘फियान’मधल्या 27 मच्छीमारांचे मृतदेह सापडले

November 18, 2009 10:13 AM0 commentsViews: 1

18 नोव्हेंबर 'फियान' चक्रीवादळात बेपत्ता झालेल्या मच्छीमारापैकी आतापर्यंत 27 मृतदेह हाती लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या 5 नौका आणि 66 खलाशी अजूनही बेपत्ता आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 8 नौका आणि 13 खलाश्यांचा शोध लागलेला नाही. फियान वादळाला 8 दिवस उलटल्यानंतर देवग़डमधले 3 मच्छीमार रत्नागिरीच्या भगवती बंदरात सुरक्षित परतलेत. त्यामुळे जर सरकारी यंत्रणांकडून शोधकार्य व्यापक केलं तर काही मच्छीमार जिवंत सापडू शकतात. त्यामुळे सरकारने शोधमोहीम तीव्र करावी अशी मच्छीमारांच्या नातेवाईकांची मागणी आहे.

close