क्रेडिट, डेबिट कार्डाच्या वापरावर करसवलत?

June 23, 2015 11:10 AM0 commentsViews:

credit swape

23  जून : क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डने पेमेंट करणार्‍यांना लवकरच अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने क्रेडिट-डेबिट कार्ड युझरना आयकरामध्ये सूट देण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

यासोबतच केंद्र सरकारने कार्डच्या वापरला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रकारचे ट्रान्झॅक्शन चार्जेस बंद करण्याचाही प्रस्ताव ठेवला आहे. करचुकवी कमी करणे, बनावट नोटांचं चलन कमी करणे आणि एकूणच रोखविरहीत अर्थव्यवस्थेकडे जाणे, ही या पाऊलामागची कारणं आहेत.

केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, रेल्वे तिकीटाच्या खरेदीवर कोणत्याही प्रकारचा ट्रान्झॅक्शन चार्ज लागणार नाही.

दरम्यान सरकारने या प्रस्तावावर जनतेकडून त्यांचं मत मागितलं आहे. नागरिक 29 जून 2015 पर्यंत त्यांचं मत नोंदवू शकतात.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close