राज्यातल्या 700 अंध शिक्षकांना सहा महिन्यांपासून पगार नाही

November 18, 2009 10:29 AM0 commentsViews: 5

18 नोव्हेंबर महाराष्ट्रातल्या जवळपास 700 अंध शिक्षकांना गेल्या सहा महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. शिक्षकांची जबाबदारी राज्य सरकारची की केंद्राची या वादात शिक्षकांचे पगार रखडले आहेत. अंध-अपंग एकात्म शिक्षण योजना कुणी चालवायची या वादात शिक्षकांची फरपट होत आहे. 1978 साली ही योजना केंद्र सरकारने सुरू केली होती. जुन 2009 मध्ये परिपत्रक काढून केंद्राने ही योजना चालविण्याची जबाबदारी राज्य सरकारला दिली. मात्र राज्य सरकारने गेल्या सहा महिन्यांपासून या शिक्षकांचे पगारच दिलेले नाही. त्यामुळे या शिक्षकांचे हाल होत आहेत. त्यांच्यावर आता कर्ज काढून घर चालवण्याची वेळ आली आहे.

close