‘मिशनरीज’च्या प्रमुख सिस्टर निर्मला यांचे निधन

June 23, 2015 12:29 PM0 commentsViews:

sister nivedita

23  जून : मदर तेरेसा यांचा वारसा समर्थपणे सांभाळणार्‍या मिशनरीज ऑफ चॅरिटीजच्या प्रमुख सिस्टर निर्मला यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या.

सिस्टर निर्मला या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यातच हृदय़विकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. 1997 मध्ये मदर तेरेसा यांच्या निधनानंतर मिशनरीज ऑफ चॅरिटीजच्या प्रमुखपदाची धुरा सिस्टर निर्मला यांच्यावर सोपविण्यात आली होती.

वयाच्या 17व्या वर्षी सिस्टर निर्मला यांनी आपलं जीवन गरीब, गरजू आणि आजारानं ग्रासलेल्या जनतेच्या सेवेसाठी समर्पित केलं. त्यांच्या देखरेखीखाली मिशनरीजच्या सर्व शाखांचा कारभार सुरळीत सुरू होता. त्याच्या या समाजकार्यासाठी त्यांना 2009 साली पद्मविभूषन पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

दरम्यान, सिस्टर निर्मला यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close