अचानक आवाज झाला आणि शेतात 22 फूटाचा खोल खड्डा पडला!

June 23, 2015 3:23 PM0 commentsViews:

Palgharkhadda23 जून : पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यात पाचलकर पाडा इथे एका शेत जमिनीत अचानक खड्डा पडला आहे. तुलसी कोथे या महिलेच्या शेतात जमीन खचुन जवळपास 22 फुटाचा गोल खड्डा निर्माण झाला आहे. रात्रीच्या गडद अंधारात पडलेल्या या खड्डयाने गावकर्‍यांची झोपच उडाली आहे. आकाशातून काहीतर पडलं असल्याचा संशय गावकर्‍यांना आहे.

रात्री अचानक जोरदार आवाज झाला आणि शेतात 22 फूट खोल खड्डा पडला, असं इथल्या गावकर्‍यांचं म्हणण आहे. झाडं पडलं असावं अशा अंदाजामुळे रात्री कोणीही तेथे गेले नाही. मात्र सकाळी शेतात जाताना काही लोकांनी हा खड्डा पाहिला आणि त्यांनी लगेचच याबाबतची माहिती तुलसी कोथे यांना दिली. खड्ड्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, विक्रमगडमधील शासकीय अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. भूगर्भ शास्त्रज्ञांच्या अहवालानंतरच या गोष्टीची अधिक माहिती मिळणार आहे. त्यामुळे कोणताही अधिकारी कॅमेर्‍यासमोर बोलण्यास नकार देत आहे. मात्र अचानक पडलेल्या या खड्डयाचं रहस्य जनतेसमोर लवकरात लवकर उघडं होणं गरजेचं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close