‘ना मन की बात, ना सबका साथ’, भाजपमध्ये पुन्हा पोस्टर वॉर

June 23, 2015 6:24 PM0 commentsViews:

sanjay joshi poster3423 जून : भाजपमध्ये पुन्हा एकदा पोस्टर वॉर सुरू झालंय. दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या घराबाहेर संजय जोशी यांच्या नावाने पोस्टर लावण्यात आले आहेत. ‘ना संवाद, ना मन की बात,ना सबका साथ, ना सबका विकास फिर क्यों करे जनता आप पर विश्वास’ असा सवाल या पोस्टरमधून उपस्थित करण्यात आलाय.

दिल्लीत भाजप मुख्य कार्यालय आणि अध्यक्ष अमित शहांच्या घराबाहेर या पोस्टर्समधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीची नाराजी व्यक्त करण्यात आलीय. या पोस्टर्समध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश यांना रमजानच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पण, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवाद आणि ‘मन की बात’लाही टोमणा लगावण्यात आलाय.

पक्षात अडवाणी, सुषमा स्वराज, संजय जोशी, वसुंधरा राजे, नितीन गडकरी, राजनाथ सिंह हे सर्व नाराज आहेत. मग कसले आले आहेत ‘अच्छे दिन’ असा सवाल विचारण्यात आलाय.

विशेष म्हणजे संजय जोशी आणि नरेंद्र मोदी यांच्यातलं वितुष्ट सर्वांना माहिती आहे. याअगोदरही संजय जोशी यांच्या समर्थकांना पोस्टर लावून भाजपमधील धुसफूस चव्हाट्यावर आणली होती. अलीकडे संजय जोशी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती.

भागवत -जोशी यांच्या भेटीमुळे संजय जोशींची ‘घरवापसी’ होणार अशी चर्चा रंगली होती. आता, संजय जोशी यांच्या नावे पोस्टर लावण्यात आल्यामुळे जोशी सक्रीय झालेत की, पोस्टर लावण्याचा कुणाचा खोडासाळपणा केलाय हे पाहावं लागणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close