सलमानच्या कानाखाली आवाज

November 18, 2009 10:30 AM0 commentsViews: 6

18 नोव्हेंबर नवी दिल्लीत सलमान खानच्या पार्टीत एका दारू प्यायलेल्या मुलीनं सल्लूमियाँच्या थोबाडीत मारली. ही मुलगी एका बिल्डरची मुलगी आहे. तिने सुश्मिता सेन आणि सोहेल खानलाही शिव्यांची लाखोली वाहिली. एवढं सगळं होऊनही सलमानने आपला ताबा सोडला नाही. त्याने सिक्युरिटीला बोलवून त्या मुलीला पार्टीबाहेर जायला सांगितलं. सलमान खानच्या पाटर्‌या नेहमीच वादग्रस्त होत असतात. नवी दिल्लीमधल्या अशाच एका पार्टीच्या रंगात हा बेरंग झाला.

close