मुख्यमंत्र्यांना जेव्हा राग येतो…

June 23, 2015 11:10 PM0 commentsViews:

cm on media23 जून : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शांत,अभ्यासू स्वभावाचे..कोणत्याही अवघड विषयाला सोप करून सांगण्याची त्यांची शैली…पण, जेव्हा मुख्यमंत्र्यांना जेव्हा राग येतो तेव्हा काय घडतं हे आज पत्रकार मंडळींनी जवळून पाहिलं. हे योग्य नाही, बिव्हे वियर युअर सेल्फ..(Behave Your self ) अशा शब्दातच मुख्यमंत्र्यांना मीडियाच्या प्रतिनिधींना सुनावलं.

त्याचं झालं असं की, मुख्यमंत्री फडणवीस विधानभवनातून बाहेर पडले होते. आपल्या कारकडे जात असताना नेहमीप्रमाणे पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना एकच गराडा घातला. ललित मोदी आणि राकेश मारियांच्या भेटीवर पत्रकारांनी प्रश्नांची सरबती केली.

पत्रकारांनी वारंवार एकाच प्रश्नावर प्रतिक्रिया विचारली. तेव्हा शेवटी मुख्यमंत्र्यांना राग अनावर झाला आणि ते चिडले..त्यांनी पत्रकारांनाच हे योग्य नाही असं सांगत Behave Yourself असंही सुनावलं. मुख्यमंत्र्यांचं चिडलेलं रूप पाहुन पत्रकारही अवाक् झाले. मुख्यमंत्री आपल्या कारमध्ये बसून निघून गेले पण, मुख्यमंत्री चिडले का ? असा प्रश्न पत्रकारांना पडला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close