नौदल आणि तटरक्षक दलाची यशस्वी मोहीम, 14 खलाश्यांचे वाचवले जीव

June 24, 2015 1:37 PM0 commentsViews:

navy abdjbaj

24 जून : मुंबईजवळच्या समुद्रात बुडणार्‍या एका जहाजावरच्या 14 खलाश्यांची भारतीय नौदल आणि तटरक्षकदलाने सुटका केली आहे. सकाळी साडे आठच्या सुमारास एम व्ही कोस्टल प्राईड या खाजगी जहाजातून 14 कर्मचार्‍यांची सुखरूप सुटका करण्यात आली.

मुंबईपासून 250 किलोमीटर तर दमण पासुन 75 किलोमीटर खोल समुद्रात हे जहाज खराब हवामानामुळे आणि जोरदार पावसामुळे मध्येच बंद पडलं. हे जहाज गुजरातहून सिमेंट कंटेनर्स घेऊन मुंबई बंदराच्या दिशेने येत होतं. पण उधाणलेल्या समुद्रात मध्येच बंद पडल्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर या 14 कर्मचार्‍यांनी लगेचच भारतीय नौदल आणि तटरक्षकदलाला संपर्क साधला आणि मदतीसाठी आवाहन केलं. त्यानंतर नौदलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेण्यात आलं .

त्यानंतर लगेचच नौसेनेनं सीकिंग हेलिकॉप्टर आणि 2 चेतक हॅलिकॉप्टर्सच्या मदतीने जहाजातील कॅप्टनसह 14 कर्मचार्‍यांना सुखरूप बाहेर काढलं. या सर्व कर्मचार्‍यांना उमरगाव इथे सुरक्षित आणण्यात आलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close