पालघरनंतर आता कुलाब्यातही रहस्यमय खड्डा, गूढ कायम!

June 24, 2015 2:49 PM0 commentsViews:

ÜÖ±ú†Öꆆ†Öê

24 जून : पालघरमध्ये सोमवारी रात्री पडलेल्या 20 फूट खोल खड्‌ड्याचं रहस्य कायम असताना आता मुंबईतल्या कुलाबा रेडिओ क्लबच्या परिसरात समुद्र किनार्‍याला लागून असलेल्या भिंतीजवळील फुटपाथवर मोठा खड्डा पडला आहे.

हा खड्डा सुमारे 10 ते 15 फूट रूंद आणि तेवढाच खोल आहे. रात्री साडे आकराच्या सुमारास हा ख़ड्ड पडला असून सकाळी आलेल्या भरतीमुळे या खड्‌ड्याच्या स्वरूपात बदल झाला आहे. फूटपाथवर अचानक इतका मोठा खड्डा पडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यामागचं कारण अजूनही अस्पष्ट असून हा खड्डा बुजवण्यात आलेला नाही. मात्र एवढा मोठा खड्डा पडला तरी कसा, याचं रहस्य काय आहे, हा प्रश्न पडलाय. पालघर आणि कुलाब्यातल्या खड्‌ड्यांच्या कारणामागे काही साम्य आहे का याचीही उत्सुकता आहे.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close