नक्षलवाद्यांच्या विरोधात लष्कराचा वापर नको – भारताचे लष्कर प्रमुख

November 18, 2009 1:26 PM0 commentsViews: 2

18 नोव्हेंबर नक्षलवाद हा सामाजिक आणि आर्थिक घटकांमधील संघर्ष असल्याने त्यांच्या विरोधात लष्कराचा थेट सहभाग नको असं लष्कर प्रमुख जनरल दीपक कपूर यांनी म्हटलं आहे. देशाच्या अनेक राज्यांत वाढत असलेल्या नक्षलवादामुळे सुरक्षा व्यवस्थेपुढे आव्हान उभं आहे. नक्षलवादाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभुमीवर दीपक कपूर यांच्या या भूमिकेला महत्त्व प्राप्त झालंय. नक्षलवादाचा प्रतिकार करण्यासाठी सरकारने वेगवेगळे उपायही योजले आहेत. पुणे विद्यापीठाच्या संरक्षणशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या जनरल बी.सी. जोशी स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.

close