पंकजा मुंडेंच्या खात्यात 206 कोटींचा घोटाळा ?

June 24, 2015 4:34 PM2 commentsViews:

pankaja_munde_deprt_scam24 जून : राज्यात फडणवीस सरकार सत्तेवर विराजमान होऊन वर्ष होत नाही तेच महाघोटाळ्यामुळे हादरा बसलाय. महिला आणि बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्यात तब्बल 206 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय. अंगणवाड्यांना पुरवण्यात येणार्‍या साहित्यांसाठी ट्रेंडरच न काढता कंत्राटं देण्यात आलीये. सुमारे 45 हजार अंगणवाड्यांसाठी 24 प्रकारच्या वस्तूंच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या घोटाळ्यामुळे राज्याच्या पंकजा मुंडे अडचणीत सापडल्या आहे.

राज्यातल्या सुमारे 45 हजार अंगणवाड्यांसाठी 24 प्रकारच्या वस्तूंच्या खरेदीमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची बाब समोर आली आहे.
वेगवेगळ्या प्रकारची चिक्की, प्रोटीन पावडर, सतरंजी, प्लास्टीक चटई, चित्रकलेची पुस्तकं अशा एकूण 24 वस्तूंची खरेदी तब्बल 206 कोटींना करण्यात आली आणि त्यासाठी कोणतंही टेंडर काढण्यात आलं नव्हतं.

यामध्ये राजगिरा चिक्की, खोबरा चिक्की, मायक्रो न्युट्रीयन्ट चिक्कीचे 113 कोटी रुपयांचे खरेदीचे प्रस्ताव दोन दिवसांत महिला आणि बालविकास खात्यानं तातडीनं मंजूर केले. विशेष म्हणजे चिक्कीचे प्रस्ताव उच्च न्यायालयाचे आदेश डावलून सुर्यकांता महिला औद्योगिक सहकारी संस्थेला बहाल करण्यात आले. सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या 18 डिसेंबरला नव्या सरकारनं एक जीआर काढुन तीन लाख रुपयांच्या वरचं कुठलंही टेंडर ई-टेंडर पद्धतीनंच काढण्यात यावं असा निर्णय घेतला. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

पण, या घोटाळ्यात मात्र महिला आणि बालविकास खात्यानं खरेदीचे प्रस्ताव आल्या आल्या तातडीनं मंजूर करुन नियमांचं उल्लंघन केल्याचं कागदोपत्री सिद्ध होतं. अव्वाच्या सव्वा दरात वस्तूंची खरेदी झालीये. त्यातही 6-7 कोटी रुपयांची चिक्की तब्बल 113 कोटींना खरेदी करण्याचा अजब निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे या घोटाळ्याची सविस्तर चौकशी करण्यात यावी आशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केलीये.

अंगणवाडी 206 कोटींचा घोटाळा

टेंडर न काढतात कोट्यवधींची खरेदी
24 वस्तूंची खरेदी
 7 कोटींची चिक्की 113 कोटींना
शालेय साहित्य
राजगिरा चिक्की
खोबरा चिक्की
मायक्रो न्यूट्रियन्ट चिक्की
प्रोटीन पावडर
सतरंजी

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Sagar More

    Lahan mulancha ayushyashi khelaycha kay adhikar ahe yana. Mahila ani Bal vikas. kasa honar bal vikas jar tyana milalelya aharat yanche commission ani ghotale astat. Maggie band keli pan lahan mulana dilya janarya poshan aharache kay tyachi test kadhi karnar tyatle ghotale konti company kartey tyanchavar kadhi bandi yenar ani mag ase sarkar kay kamache. Janta maf nahi karengi cha nara det vote magitale pan ata kay karat ahet. Kadhi badalnar he sagle? Swatahala maharastrachi pahili Mahila Mukhyamantri banaychi swapna pahanari Pankaja Munde… kiti bhrasth ahe he siddh hote. Police kahi action ka ghet nahit. Sagle jhoplet ka. Asha batamya TV var breaking news mahun tyancha pathpurava ka hot nahi. Khoti Engineering chi Degree ek veles parvadel pan lahan mulacha aharat ghotala???????

  • Pingback: घोटाळा नाहीच!, दोषी आढळले तर राजीनामा देईन -पंकजा मुंडे | IBN Lokmat Official Website

  • Ninad Malavde

    We know Lokmat is pro khan gress. Mind well that the contract was given to company which is owned by Congress leader from Sindhudurga.. Stop spreading the wrong word and do your job responsibly…

close