स्मृती इराणींना धक्का, बोगस पदवीप्रकरणी याचिका दाखल

June 24, 2015 4:54 PM0 commentsViews:

23smrutiirani24 जून : बोगस पदवीमुळे वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झालीये. बोगस पदवीप्रकरणी स्मृती इराणी यांच्याविरोधातली याचिका दिल्ली कोर्टाने दाखल करून घेतलीय. याबाबतची सुनावणी 28 ऑगस्टला होणार आहे.

इराणी यांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेविषयी निवडणूक आयोगाकडे 2 वेगवेगळी प्रतिज्ञापत्रं सादर केली आहेत. 2004 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी 1996 मध्ये दिल्ली विद्यापीठातून बीए केल्याचा उल्लेख केला आहे तर 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात 1994 मध्ये दिल्ली विद्यापीठातून बी कॉम केल्याचा उल्लेख केला आहे.

त्यामुळे इराणी यांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती पुरवल्याचा आरोप होतोय. स्मृती इराणी यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची शैक्षणिक माहिती दिल्याचा दावा याचिकेत करण्यात आलाय. कोर्टाने ही याचिका दाखल करून घेत स्मृती इराणी यांना धक्का दिलाय. इराणी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीनं केलीय. पण भाजपनं ही मागणी फेटाळून लावलीय.

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close