मेळघाटात राजरोस दारू आणि मटणाच्या पाटर्‌या

November 18, 2009 1:37 PM0 commentsViews: 15

18 नोव्हेंबर संरक्षित वनक्षेत्र असलेल्या विदर्भातल्या मेळघाटात राजरोस दारू आणि मटन पाटर्‌या होत असल्याचं उघड झालं आहे. वनविभागाच्या विश्रामगृहात मांसाहार बंद केला असला तरी काही जण मात्र येथे बिनदिक्कत पाटर्‌या करत आहेत. वन कायदा सर्रास पायदळी तुडवून अशा पाटर्‌या चालू आहेत. त्यातच वनकर्मचारीही याकडे डोळेझाक करत आहे. वनकर्मचार्‍याच्या देखत पार्टी करणारे पळून जातात. मात्र त्यांच्या गाडीची नाक्यावर साधी नोंदही होत नाही यावरुन वनकर्मचार्‍यांचा हलगर्जीपणा पुढे आलाय.

close