विखे पाटलांचा असा कसा विरोध ?, आपल्याच कारखान्यात देशी दारूचं उत्पादन !

June 24, 2015 6:04 PM0 commentsViews:

radakrushan vikhe patil 324 जून : मालवणी विषारी दारू प्रकरणानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यभरात दारुबंदीची मागणी केलेली आहे. पण विखे-पाटील यांची ही मागणी म्हणजे दुटप्पीपणाचा नमुनाच आहे. याच राधाकृष्ण विखे पाटील यांनी चंद्रपुरात झालेल्या दारुबंदीला विरोध केला होता. एवढंच नाहीतर याविरोधात हायकोर्टात याचिकाही दाखल केलीये. आणि ही याचिका कशासाठी तर चंद्रपुरात दारूबंदीमुळे त्यांच्या मालकीच्या साखर कारखान्यात तयार होणार्‍या रॉकेट नावाच्या देशी दारूची विक्री ठप्प झाली म्हणून…

राधाकृष्ण विखे पाटील यांची एकहाती सत्ता असलेल्या पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात मोठ्या प्रमाणात रॉकेट नावाने प्रसिद्ध असलेल्या देशी दारूचे उत्पादन होते. यापैकी नव्वद टक्के दारु चंद्रपुरात विकली जात होती, पण चंद्रपुरात दारुबंदी लागू झाल्यावर कारखान्याला वर्षामागे 50 ते 60 कोटी रुपयांचा फटका बसतयला लागला. त्यामुळे चंद्रपुरातली दारुबंदी उठवावी अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटलांनी केली होती, अनेकवेळा मागणी करुनही ती मान्य होत नाही हे बघून विखे-पाटलांना थेट हायकोर्टात धाव घेतलेली होती. हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेची प्रतही आयबीएन लोकमतच्या हाती लागलेली आहे. याचाच अर्थ स्पष्ट आहे की, विखे-पाटील हे दारुबंदीच्या विरोधातच आहेत. स्वत:च्या कारखान्यात देशी दारुचं उत्पादन करत असताना राज्यभरात दारुबंदीची मागणी करणं ही खूपच मोठी राजकीय विसंगती आहे. या सगळ्या कारणांमुळेच राधाकृष्ण विखे पाटील यांची दारुबंदीची मागणी म्हणजे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असाच प्रकार असल्याचं उघड होतंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close