चिक्की घोटाळा प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावं -चव्हाण

June 24, 2015 8:43 PM0 commentsViews:

ex cm on ncp 3324 जून : महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्यातील घोटाळा प्रकरण हे गंभीर आहे. सकृतदर्शनी हा घोटाळा झालाय हे स्पष्ट दिसतंय. हे प्रकरण सीबीआय किंवा एसीबीकडे सोपवण्यात यावं अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीये. हे प्रकरण गंभीर असून पंकजा मुंडे यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही अशी टीकाही चव्हाण यांनी केली.

फडणवीस सरकारला सत्तेवर विराजमान होऊन वर्षही होत नाही तेच 206 कोटींच्या महाघोटाळ्याने एकच खळबळ उडालीये. विरोधकांनी फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरलेय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना फडणवीस सरकारवर सडकून टीका केलीये.

मोदी सरकारच्या काळात सगळं काही आलबेल सुरू आहे. पंकजा मुंडेंच्या खात्यात झालेल्या घोटाळा हा गंभीर आहे. 206 कोटी काही चिल्लर रक्कम नाहीये. 206 कोटींचे ही लोक सहज घोटाळे करत आहे. आपण घोटाळा केला, आपल्यावर कितीही गंभीर आरोप झाले तरी डगमगायचं नाही. राजीनामा द्यायचा नाही असं एक सूत्र पंतप्रधान मोदींच्या स्तरावर ठरलंय.

त्यामुळे खालपर्यंत सगळेच जण याचा अवलंब करत आहे अशी परखड टीका चव्हाणांनी केलीय. तसंच सुषमा स्वराज-ललित मोदी प्रकरण असो किंवा कोणत्याही नेत्यांने वादग्रस्त विधान केलं असले. राज्यातील विनोद तावडे यांचं बोगस डिग्री प्रकरण असेल. यावर आता कुणीच काही बोलत नाही. भाजप नेत्यांचं मौन एका प्रकारे घोटाळ्यांना मुक संमत देत आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंनी मंत्रिपदावर राहू नये अशी मागणीही त्यांनी केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close