पुण्यात महिलेचा संशयास्पद मृत्यू

November 19, 2009 10:22 AM0 commentsViews: 1

19 नोव्हेंबर पुण्याच्या पाषाण परिसरातल्या बंजारा तांड्यावरच्या एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पोलिसांनी मारहाण केल्यानेच या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. रात्री गस्तीवरच्या पोलिसांनी बंजारा तांड्यावर छापा टाकला होता. संबंधित पोलिसांवर कारवाई झाल्याशिवाय ससून हॉस्पिटलमध्ये असणारा महिलेचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका गावकर्‍यांनी घेतली आहे. यामुळे ससून हॉस्पिटल परिसराला पोलिसांच्या छावणीचं स्वरुप आलं आहे. तर पाषाण गावातही पोलिसांच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

close