घोटाळा नाहीच!, दोषी आढळले तर राजीनामा देईन -पंकजा मुंडे

June 24, 2015 11:09 PM1 commentViews:

24 जून : मी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही, कोणताही गैरव्यवहार केला नाही आणि काही भ्रष्टाचार आढळला किंवा मी दोषी आढळले तर राजीनामा देण्यास तयार आहे अशी बेधडक प्रतिक्रिया महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. तसंच आपण कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार असल्याचंही पंकजांनी सांगितलं. पंकजा मुंडेंनी लंडनहून आयबीएन लोकमतशी बातचीत केली यावेळी त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.pankaja munde

पंकजा मुंडे म्हणतात, विरोधकांनी जे काही आरोप केले आहे ते अभ्यासशून्य आहे. मुळात हे टेंडर नाहीत हे रेट कॉन्ट्रॅक्ट आहे. आम्ही ज्यावेळी निर्णय घ्यायचा ठरवला त्यावेळी एकच रेट कॉन्ट्रॅक्ट आल्यानं त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलं.यात मी एकाही महिला संस्थेला कॉन्टॅक्ट दिलेलं नाही. खरंतर हे मागच्या सरकारचे कॉन्ट्रॅक्ट आहे. ते रखडलेले होते याबद्दलचा निर्णय आम्ही फेब्रुवारीत घेतले. कारण, चालू वर्षांचं बजेट लॅप्स होऊ नये म्हणून हे निर्णय घेतले होते. मुळात पोषण आहाराचे पैसे खाण्यावर खर्च करण्याचं बंधन असल्यानं उरलेल्या पैशातून चिक्की दिली. मग यात भ्रष्टाचार कुठे ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

तसंच, मी परदेशात गेल्यानंतर हे प्रकरण घडलं याचा खेद वाटतो. पण, माझ्या पाठीमागे माझी बदनामी करण्याचा हा प्रयत्न केला जात आहे. मी कडक काम करते याचा मला त्रासही होतो, भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी प्रयत्न करतेय याचाही त्रास होतो. माझ्यावर हे अभ्यासशून्य आरोप करण्यात आले. माहिती नसताना असे आरोप करुन करिअर खाईत ढकललं जात आहे. जलयुक्त शिवाराचं काम केलं. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पण, त्याचं कुठे कौतुक नाही. पण, आता आरोप झाले याबद्दल दु:ख वाटतंय अशी खंतही पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं.

संबंधित बातम्या

पंकजा मुंडेंच्या खात्यात 206 कोटींचा घोटाळा ?

 

असंही बाल’कल्याण’, 6-7 कोटींची चिक्की 113 कोटींना खरेदी ?

चिक्की घोटाळा प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावं -चव्हाण

‘पंकजा मुंडेंचं काम उत्तमच’

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Dhiraj Mundhe

    ज्यांच्या मनी आहे काळे त्यांचे मन चांगले काम पाहून जळे अशी काही अवस्था विरोधकांची झाली आहे त्यांनी तर काही केल नाही आता कोणी करत आहे तर त्याला विरोध करतात .

close