राज ठाकरेंनी घेतली नारायण राणेंची भेट

June 24, 2015 11:36 PM0 commentsViews:

24 जून : एकेकाळी शिवसेनेत खांद्याला खांदा लावून काम करणारे राज ठाकरे आणि नारायण राणे यांची भेट झालीये. राज ठाकरे यांनी आज (बुधवारी) संध्याकाळी कणकवलीत राणेंच्या घरी जाऊन राणेंची भेट घेतलीये.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौर्‍यावर आहेत. रत्नागिरी नंतर राज यांचा आजपासून सिंधुदुर्ग दौरा सुरू झालाय.

आज संध्याकाळी राज ठाकरे यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या कणकवली निवास्थानी ओम गणेश बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. राज आणि राणे यांच्यात 20 मिनिटं चर्चाही झाली.

मात्र, राज आणि राणे याची ही वैयक्तिक भेट असल्याचं मनसेच्या सूत्रांकडून सांगण्यात येतंय. राज यांनी राणे यांची अचानक घेतलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय.

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close