आणीबाणी देशाच्या इतिहासातला सर्वात काळा अध्याय – नरेंद्र मोदी

June 25, 2015 11:47 AM0 commentsViews:

Narendra Modi on emergency

25 जून : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात जाहीर केलेल्या आणीबाणीला आज (गुरूवारी) 40 वर्षं पूर्ण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, भारतीय इतिहासातील सर्वात काळा अध्याय असल्याचं सांगत तत्कालीन राजकीय नेतृत्त्वाने आपल्या लोकशाहीला पायदळी तुडवलं असल्याची टिपण्णी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून केली आहे.

‘आणीबाणीविरुद्ध संपूर्ण क्रांतीचे आवाहन करणार्‍या लोकनेते जयप्रकाश नारायण यांना प्रतिसाद देत देशभरातल्या अनेक नागरीकांनी लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी स्वत:ला निस्वार्थीपणे झोकून दिले. आणीबाणीला विरोध करणार्‍या आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी झटणार्‍या त्या नागरिकांचा आम्हाला अतिशय अभिमान आहे’, असेही मोदींनी नमूद केलं आहे.

आणीबाणीच्या काळातल्या माझ्या स्वत:च्याही अनेक आठवणी ताज्या झाल्या आहेत. आणीबाणीविरोधातील आंदोलनातून आम्हा तरूणांना अनेक गोष्टी शिकायला मिळालं, असंही मोदींनी नमूद केलं आहे. त्याकाळात लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी एकत्रितपणे झटणार्‍या संस्था आणि नेत्यांबरोबर काम करण्याची उत्तम संधी मिळाली, असेही त्यांनी म्हटले आहे.

तसंच एक सशक्त, उदारमतवादी स्वातंत्र्याचा पुरसक्रा म्हणजे प्रगतीची, विकासाची गुरूकिल्ली आहे असं सांगत लोकशाही अजून मजबुती करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, असे आवाहनही त्यांनी केलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close