रेवदंडा समुद्र किनार्‍यावर ‘त्या’ व्हेलमाशाचा अखेर मृत्यू

June 25, 2015 2:49 PM0 commentsViews:

ravedanda whale1 (2)25 जून : रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग किनार्‍यावर आढळलेल्या लांबिचा व्हेल माशाचा अखेर मृत्यू झाला आहे. अलिबागच्या रेवदंडा समुद्रकिनारी काल दुपारी हा मासा आढळून आला होता. या माशाची लांबी तब्बल 20 ते 25 फुट फूट असून त्याचं वजन 2 हजार किलो इतकं आहे.

काल समुद्र किनारी हा मासा आढळून आल्यानंतर त्याला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. यानंतर त्याला खोल समुद्रात नेण्याचेही प्रयत्न सुरू झाले. स्थानिक गावकरी, रायगड च्या जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी किनार्‍याला भेट देऊन माश्याची पाहणी केली. त्यानंतर पोलीस आणि नौदलाला पाचारण करण्यात आलं. या माशाला खोल समुद्रात ढकलण्याचे प्रयत्न करण्यात आलं. मात्र आज पहाटे चारच्या सुमारास या माशाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. जहाज किंवा बार्जच्या धडकेमुळे तो जखमी झाला असावा असं सांगितलं जातं आहे. सध्या या माशाचे विल्हेवाट लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close