आठ दिवसात मराठी शिकणार – अबू आझमी

November 19, 2009 1:49 PM0 commentsViews: 5

19 नोव्हेंबर महाराष्ट्राच्या विधिमंडळात हिंदी आणणार, अशी प्रतिज्ञा करणार्‍या अबू आझमींनी अखेर मराठी शिकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शिक्षक नेमल्याचं त्यांनी सांगितलं. आठ दिवसांत मराठी शिकणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. आमदारकीची शपथ हिंदीत घेतल्याबद्दल आझमींचा लखनौमध्ये समाजवादी पक्षाने नुकताच सत्कार केला. त्यावेळी बोलताना आझमींना कुणाच्या दबावाखाली मराठी शिकणार नाही. त्यासाठी आपल्याला वेळही नाही, असं सांगितलं होतं. तसंच विधिमंडळात हिंदी आणणार असं आव्हानही राज ठाकरेंना दिलं होतं.

close