चाळीसगावजवळ बस-कंटेनर अपघातात २२ ठार

June 25, 2015 11:07 PM0 commentsViews:

chalisgaon accident25 जून : : जळगाव चाळीसगाव दहिवद फाट्याजवळ एसटी बस आणि कंटेनरमध्ये जोरदार धडक झालीये. या भीषण अपघातात मृतांचा आकडा 22 वर पोहचला आहे. एसटी बसमधील 18 प्रवाशी, कंटेनरमधील 3 आणि एका दुचाकीस्वाराचा यात मृत्यू झालाय. 35 जण जखमी झाले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, बसचा यात चुराडा झाला. या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडलाय. एसटी बस चाळीसगाववरून दुपारी एकला निघाली आणि चिंचगव्हाण फाट्यावर प्रवासी घेण्यासाठी थांबली होती. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर चालकाने दुचाकी स्वाराला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी त्याचा कंटेनरवरचा ताबा सुटला आणि बसवर कंटेनर आदळला. हा अपघात इतका भीषण होता की, कंटेनरच्या धडकेनं बसचा अर्धा भाग कापला गेलाय. बसचा चुराडा झाल्यामुळे 20 जणांचा मृत्यू झाला. 15 ते 20 जखमी असून आणखी यातील काही जण गंभीर आहेत. जखमींवर चाळीसगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ज्या दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न केला त्याचाही कंटेनरखाली येऊन मृत्यू झाला. 18 जखमींना चाळीसगावच्या साईकृष्ण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. तर इतर जखमींना धुळ्याच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलंय.

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close