आपला सचिन, 21 व्या शतकातील सर्वात महान टेस्ट खेळाडू !

June 25, 2015 5:59 PM0 commentsViews:

we5sachin_book25 जून : विक्रामादित्य, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं केलेल्या ऑनलाईन सर्व्हेमध्ये क्रिकेट फॅन्सनं सचिन तेंडुलकरला 21 व्या शतकातील सर्वात महान टेस्ट खेळाडू म्हणून घोषित केलंय.

एकूण 16 हजार क्रिकेट फॅन्सनं या सर्वेक्षणात आपलं मत नोंदवलं होतं. या सर्वेक्षणात 23 टक्के फॅन्सची पसंती मिळवत सचिन नंबर वन ठरलाय. तर श्रीलंकेचा माजी कॅप्टन आणि दिग्गज खेळाडू कुमार संगकारानं याच यादीत दुसरं स्थान पटकावलं. तर ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू ऍडम गिलख्रिस्ट आणि रिकी पॉण्टिंग तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर राहिले आहेत. सचिननं 24 वर्षांच्या आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत 200 टेस्टमध्ये 53.78 च्या ऍव्हरेजनं विक्रमी 51 सेंच्युरी आणि 68 हाफ सेंच्युरी ठोकत 15 हजार 921 रन्स ठोकले होते. याच कार्याची दखल घेऊन त्याला चाहत्यांनी नंबरवनचा बहुमान दिलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close