चिक्की घोटाळ्याची ‘एसीबी’ने मागितली माहिती

June 25, 2015 6:23 PM0 commentsViews:

pankjamundechikkiscam225 जून : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या महिला आणि बालकल्याण खात्याच्या 206 कोटींच्या निविदा प्रकरणी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीने हालचाली सुरू केल्या आहेत. एसीबीचं प्रधान सचिवांना पत्र लिहून या संदर्भात माहिती मागवलीय.

पंकजा मुंडे यांच्याविरोधात काँग्रेसनं तक्रार केल्यानंतर एसीबीने पावलं उचलायला सुरूवात केलीय. राज्यातल्या 45 हजार अंगणवाडीतल्या 24 प्रकारच्या वस्तू खरेदीमध्ये 206 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर आता राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. त्यामुळे आता एसीबी काय पावलं उचलती याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close