उसाच्या दरावरून लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ

November 20, 2009 9:28 AM0 commentsViews: 1

20 नोव्हेंबर ऊसाच्या किमतीच्या मुद्यावरुन शुक्रवारीही संसदेत गदारोळ झाला. विरोधी पक्षाने संसदेत घातलेल्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. हिवाळी अधिवेशनाचा शुकवारचा दुसरा दिवस आहे. सरकारने गेल्या महिन्यात आणलेल्या उसाच्या किंमतीबाबतच्या एका अध्यादेशामुळे संसदेत आणि संसदेबाहेर मोठा गदारोळ झाला. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज गुरुवारीसुध्दा दिवसभर स्थगित करण्यात आलं होतं. त्यानंतर सरकारने नरमाईची भूमिका घेत, सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. तसचं अध्यादेश दुरुस्ती करण्याची तयारीही दाखवली आहे. पण हा अध्यादेश मागे घेण्याच्या मागणीवर विरोधक ठाम आहेत. नव्या अध्यादेशामुळे उसाचा भाव ठरवण्यात राज्य सरकारची भूमिका कमी होणार आहे. त्यामुळे उसाला कमी दर मिळेल असं विरोधकांचं म्हणणं आहे. त्यामुळे हे विधेयक आणू नये अशी मागणी खासदारांनी केली आहे.

close