सचिनची धाव 30 हजारच्या पुढे

November 20, 2009 9:31 AM0 commentsViews: 2

20 नोव्हेंबर सचिन तेंडुलकरने टेस्ट आणि वन डे क्रिकेटच्या दोन्ही मिळून 30 हजार रन्सचा टप्पा पूर्ण केला. अहमदाबाद टेस्टपूर्वी सचिन तेंडुलकर या रेकॉर्डपासून 49 रन्स दूर होता. पहिल्या इनिंगमध्ये त्याला केवळ चार रन्स करता आले होते. पण दुसर्‍या इनिंगमध्ये मात्र त्याने 45 रन्स करत हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. टेस्टमध्ये त्याने 12822 रन्स केलेत. तर वन डेमध्ये त्याच्यानावावर 17 हजार 178 रन्स जमा आहेत. अशी कामगिरी करणारा क्रिकेट जगतातील तो एकमेव बॅटसमन आहे. ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या वन डे सीरिजमध्ये त्याने 45वी सेंच्युरी करत सतरा हजार रन्सचा रेकॉर्ड पूर्ण केला होता. सर्वाधिक टेस्ट मॅच खेळण्याचा रेकॉर्डही सचिनच्या नावावर जमा आहे. 1989साली क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सचिन आतापर्यंत तब्बल 160 टेस्ट मॅच खेळला आहे. जवळपास 55च्या ऍव्हरेजने त्याने 12 हजार 822 रन्स केलेत. यात 42 सेंच्युरी आणि 53 हाफ सेंच्युरीजचा समावेश आहे. नॉटआऊट 248 हा त्याचा टेस्ट क्रिकेटमधला हायेस्ट स्कोर आहे. वन डे क्रिकेटमध्येही सर्वाधिक 45 सेंच्युरी त्याच्या नावावर आहेत. वन डे मध्ये 45च्या ऍव्हरेजने त्याने 17 हजार 178 रन्स केलेत. तर तब्बल 91 हाफसेंच्युरीज केल्यात. नॉटआऊट 186 रन्स हा त्याचा हायेस्ट स्कोर आहे.

close