बापरे, सिंहोबा मारताय रस्त्यावर फेरफटका !

June 25, 2015 9:50 PM0 commentsViews:

25 जून : गुजरातमध्ये ‘जुमांजी’ सिनेमातल्या दृश्या सारखं दृश्य पाहण्यास मिळालं. गुजरातमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गीर नॅशनल पार्कमध्ये पाणीच पाणी झालंय. या पुरामुळे अभयारण्यातले सिंह  बाहेर आले आहेत. अभयारण्यातील सिंहोबा थेट रस्त्यावर उतरले आहे.

gujat lion4रस्त्यावर या सिंहोबांनी फेरफटकाही मारला. आता सिंहोबा रस्त्यावर आल्याचं पाहून बघ्यांची एकच गर्दी झाली आहे पण तीही लांबून आणि गाड्यांमधून…सिंहोबाही या पुरामुळे अभयारण्यातून तुर्तास मुक्तीचा आनंद लुटत आहे. पण, अभयारण्याच्या अधिकार्‍यांना ही बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा चांगलाच घाम फुटला. आता या सिंहोबांना पकडण्यासाठी बंदोबस्त लावलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close