भाजपच्या 3 मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघड करणार, विखे पाटलांचा गौप्यस्फोट

June 25, 2015 11:23 PM0 commentsViews:

vikhe patil on bjp25 जून : राज्यातील भाजपाच्या तीन मंत्र्यांचा भ्रष्टाचार लवकरच उघड करणार असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. त्या मंत्र्यांचं स्टींग ऑपरेशन सुद्धा केलंय आणि आरोप करण्यापेक्षा विधानसभेत नावं उघड करणार असं विखे पाटलांनी जाहीर केलंय.

येत्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत याबदलचे पुरावे सादर करणार आणि कोणते मंत्री हेही त्यावेळीच स्पष्ट करणार असंही विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री आणि अधिकार्‍यांना पाठीशी घालताय असा आरोपही पाटील यांनी केलाय. आता पावसाळी अधिवेशनात विखे पाटील कोणत्या मंत्र्यांची पोलखोल करता याबद्दल चर्चेला उधाण आले असून ते तीन मंत्री कोण याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहे.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close