पश्चिम रेल्वेत आता पंधरा डब्यांची लोकल

November 20, 2009 9:54 AM0 commentsViews: 3

20 नोव्हेंबर पश्चिम रेल्वेचा भार हलका करणारी 15 डब्यांची लोकल अखेर शनिवारी दादर ते विरार दरम्यान धावणार आहे. या गाडीचं उद्घाटन केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते शनिवारी मुंबईत होणार आहे. यासह दादरच्या नव्या टर्मिनसचं उद्घाटन, काही लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लेडीज स्पेशल लोकललाही रेल्वेमंत्री 'हिरव कंदील' दाखवतील. पश्चिम रेल्वेमार्गावर लोकलमधील होणारी प्रचंड गर्दी कमी करण्यासाठी या मार्गांवर 15 डब्यांची गाडी धावणार आहे. ही गाडी शनिवारी धावणार असली तरी तिच्यासाठी लांब प्लॅटफॉर्म असलेली स्टेशन्स चारच आहेत. त्यामुळे दादरनंतर, अंधेरी, बोरिवली आणि विरार या स्थानकांवरच ही गाडी थांबेल.

close