आदिवासी मुलींची सटकली, अधिकार्‍याची गाडी फोडली

June 25, 2015 11:19 PM0 commentsViews:

abad adivasi student25 जून : औरंगाबादमध्ये आज (गुरुवारी) आदिवासी वस्तीगृहातील मुलींनी आपल्या मागण्यांसाठी रौद्ररूप धारण केलं. अनेक दिवसांपासून मागण्या मान्य होत नसल्यानं आदिवासी मुलींनी चक्क अधिकार्‍याची आणि कार्यालयाची तोडफोड केलीये.

आदिवासी एकात्मिक विकास कार्यालयावर या मुलींनी हल्लाबोल केला. कार्यालयाबाहेर उभी अधिकार्‍याची गाडी फोडली. त्यानंतर मुलींना कार्यालयातील खुर्ची टेबल फोडल्या. कार्यालयातील संगणकांचीही तोडफोड केली. तर काही मुलींनी सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले.

जवळपास तासभर या संतप्त आदिवासी मुलींनी कार्यालयात तोडफोड केली. वस्तीगृहात चाललेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा आणि वस्तीगृहात सुविधा द्या, अशी त्यांची मागणी होती.

आजही याच मागण्यांवरून विभागाच्या महिला अधिकार्‍यांनी आदिवासी मुलीला चापट मारल्यानं संतप्त मुलींनी ऑफिसची तोडफोड केली. या सर्व मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close