मध्य रेल्वे रखडली, अंबरनाथ-उल्हासनगर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर खड्डा

June 26, 2015 9:16 AM0 commentsViews:

ULHASNAGER KHADDA

26 जून : अंबरनाथ-उल्हासनगर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर खड्डा पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अंबरनाथ-उल्हासनगर डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प असून अप मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. ऐन गर्दीच्या वेळी मध्यरेल्वेचा हा खोळंबा झाल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्ताप सहन करावा लागत आहे.

विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वे रुळालगत खड्डा पडला. हा खड्डा 8 ते 10 फूट खोल आहे. गेली चार दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रुळाखालची माती वाहून गेली त्यामुळे ही घटना घडली. सकाळी खोपोली लोकलमधील एका प्रवाशाने याबाबत उल्हासनगर रेलवस्थानकात कळवले, त्यामुळे खोपोली लोकल उल्हासनगर स्थानकात थांबवण्यात आली आणि होणारी मोठी दुर्घटना टळली. कर्जत, बदलापूर अंबरनाथहून मोठ्या संखेने चाकरमानी मुंबईच्या दिशेने येतात. मात्र, मध्य रेल्वेच्या खोळंब्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर कर्जतच्या दिशेने जाणार्‍या गाड्या या कल्याण स्थानकातूनच मुंबईकडे पुन्हा वळवण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून खड्डा बुजवण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. मात्र, यासाठी किती वेळ लागेल हे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलंले नाही.

दरम्यान, हा खड्डा कसा पडला याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.  या आठवड्याभरात पालघर आणि कुलाबा येथेही रहस्यमयी पद्धतीने 8 ते 10 फुट खोल खड्डे पडले होते.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close