ललित मोदींनी केला प्रियंका- रॉबर्ट वडरांना भेटल्याचा दावा

June 26, 2015 1:52 PM0 commentsViews:

lalit robert

26 जून : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी असलेले आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदींनी आता प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वडरा ट्विटरबॉम्ब टाकला आहे. मोदींनी रॉबर्ट वडरा आणि प्रियंका गांधी यांच्याशी लंडनमध्ये भेट झाल्याचा दावा केला आहे. गुरुवारी रात्री मोदींनी यासंदर्भात ट्विट केलं. मी गांधी कुटुंबीयांना लंडनमध्ये भेटलो. एका रेस्तरॉमध्ये प्रियंका आणि रॉबर्ट वडरा यांची वेगवेगळी भेट झाली. त्यावेळी केंद्रात युपीएचे सरकार होतं, असंही मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ललित मोदींशी असलेल्या संबंधांमुळे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेस करत आहे. मात्र या भेटीबद्दल काँग्रेसनं स्पष्ट करावं,अशी टीका भाजपनं केलीये. त्यामुळे आता ललित मोदींनी केलेल्या नव्या दाव्यामुळे काँग्रेससाठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ललित मोदी यांच्या ट्वीटनंतर काँग्रेसने तात्काळ पत्रकार परिषद घेतली. ललित मोदी यांचं ट्विट बालीश असल्याचं काँग्रेसने म्हटलंय. रेस्टॉरंटमध्ये अचानक कुणाला भेटणं गुन्हा नाही, अस स्पष्टीकरण काँग्रेसने दिलंय. तसंच सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे प्रकरणावर पंतप्रधानांनी मौन सोडावं, अशी मागणी काँग्रेसने पुन्हा एकदा केली आहे.

ललित मोदींचे ट्विट
ललित मोदींनी एकापाठोपाठ एक तीन ट्विट करून काँग्रेसवर ट्विटरबॉम्ब टाकला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘लंडनमध्ये गांधी कुटुंबीयांना भेटून आनंद झाला. मी रॉबर्ट वडरा आणि प्रियंका गांधी यांची एका रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळी भेट घेतली आहे. त्याठिकाणी ते टिम्मी सारना बरोबर होते. त्यांच्याकडे माझा फोन नंबर होता. ते मला फोन करू शकतात, मी त्यांच्याबाबत काय विचार करतो हे मी त्यांना सांगेल. कोणतीही डील होणार नाही पण मला त्रास देण्यासाठी काय केले जात आहे हे मी त्यांना सांगेल. मला वाटतं गेल्या किंवा त्याच्या एक वर्ष आधी जेव्हा यूपीएचे सरकार होते त्यावेळी आमची भेट झाली होती. त्यावेळी ते सत्तेत होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close