आयबीएन-लोकमतच्या ऑफिसमध्ये शिवसेनेच्या गुंडाचा राडा

November 20, 2009 4:22 PM0 commentsViews: 3

20 नोव्हेंबरआयबीएन-लोकमतच्या विक्रोळी इथल्या ऑफीसवर शिवसेनेच्या गुंडांनी तोडफोड करत हल्ला केला. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्यासह काही पत्रकारांनाही त्यांनी मारहाण केली. ऑफिसमधल्या कर्मचार्‍यांनाही या जमावाने मारहाण केली. हल्ला करणारे 10-12 जण शिवसेनेचं नाव घेत होते. बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलणार्‍यांना आम्ही सोडणार नाही अशी धमकी आणि घोषणा देत त्यांनी काचा फोडायला सुरुवात केली. खुर्चा फेकून कम्युटर्सचीही नासधुस त्यांनी केली. अर्धा तास झाला तरी पोलीस पोहचले नाहीत. हल्लेखोरांपैकी 7 जणांना आयबीएन-लोकमतच्या पत्रकारांनी आणि कर्मचार्‍यांनी पकडलं. आणि उशिरा आलेल्या पोलिसांच्या ताब्यात दिलं. अटक केल्यानंतरही हे गुंड शिवसेनेच्या घोषणा देत होते. असाच भ्याड हल्ला आयबीएन-लोकमतच्या पुणे ऑफिसवरही करण्यात आला. आणि ओबी व्हॅनचीही तोडफोड करण्यात आली. तिथेही काही शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आयबीएन-लोकमतच्या ऑफिसवरील हल्ल्याचा सर्व मीडियामधून आणि देशभरातून निषेध करण्यात येत आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील अनेक पत्रकार संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे. अशोक चव्हाण, मुख्यमंत्री : शिवसेनेने नेहमीच अशाप्रकारचे हल्ले केलेले आहेत. आमचं मीडियाला निवेदन आहे की जे पक्ष लोकशाहीवर विश्वास ठेवत नाही त्यांच्यावर बहिष्कार टाकावा.रमेश बागवे, गृहराज्यमंत्री : हल्ला भ्याड होता, हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईलकुमार केतकर, संपादक- लोकसत्ता : हा पुर्वनियोजीत हल्ला होता, उस्फुर्त हल्ला नव्हे.एन. राम, संपादक, द हिंदू : राज्य यंत्रणेवरील विश्वास उडाला असून या हल्ल्याची सीबीआय चौकशी व्हावी बरखा दत्त, कार्यकारी संपादक, एनडीटीव्ही : शिवसेनेच्या या हल्ल्याविरुद्ध सर्व मीडियाने एकत्र यायला हवं. हल्ल्याचं शिवसेनेकडून समर्थन आयबीएन लोकमतवरचा हल्ला ही शिवसैनिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हल्ल्याचं सर्मथन केलं आहे. 'आयबीएन लोकमत गेले काही दिवस बाळासाहेब ठाकरेंविरोधात सातत्याने वक्तव्य करण्यात येत आहे. त्यामुळे शिवसैनिकांची हि उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती. शिवसेना हि वाघाच्या चपळाईने चालणारी संघटना आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात कोणी बोलणार असेल तर शिवसेनेचे वाघ त्याला अशाच प्रकारे उत्तर देतील', असं या हल्याच अत्यंत निर्लज्जपणे राऊत यांनी समर्थन केलं आहे.

close