हल्लेखोरांवर कडक कारवाई करणार – मुख्यमंत्री

November 21, 2009 11:05 AM0 commentsViews: 1

21 नोव्हेंबरIBN लोकमतवरचे हल्लेखोर आणि त्यामागच्या सूत्रधारांवर तातडीने कारवाई करू, असं आश्वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलं आहे. अशा प्रकारची गुंडगिरी करून, भ्याड हल्ले करणार्‍यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यासंबंधी कायदा करण्याबाबत सरकार गांभीर्यानं विचार करेल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. IBN लोकमतवर झालेल्या हल्लेखोरांवर कारवाई करावी, या मागणीसाठी IBN लोकमतच्या टीमने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. या वेळी नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई, IBN लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्यासह IBN चे टीम मेंबर्सनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन, त्यांना कारवाईच्या मागणीचं निवेदन दिलं. त्यांच्याबरोबर प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातल्या पत्रकारांचं शिष्टमंडळही होतं. पत्रकारांवर वारंवार हल्ले होतात. त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत आणि पुरोगामी राज्यात ही गुंडशाही म्हणजे काळीमा असल्याचं मत यावेळी अनेक पत्रकारंानी व्यक्त केलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना, या हल्ल्यामागचा सूत्रधार कोणीही असो, कायद्यानुसार त्यांच्यावर कडक कारवाई करू असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

close