पोलिसांनी सिनेस्टाईलनं पाठलाग करून चंदन तस्करांना केलं जेरबंद

June 26, 2015 5:54 PM0 commentsViews:

nashik chandan26 जून : नाशिकच्या उपनगर पोलिसांनी सिने स्टाईलनं पाठलाग करून चंदन तस्करांना धारदार हत्त्यारं आणि मुद्देमालासह ताब्यात घेतलंय. या तस्करांची एक इंडिका कारही जप्त केलीय.

गेल्या काही महिन्यांपासून या चोरट्यांनी पोलीस बंदोबस्त असलेल्या नाशिक न्यायाधीश आणि जिल्हाधिकार्‍यांच्या घराच्या आवारातली चंडनाची झाडं, तसंच मंदिर, औद्यागिक परिसरातील चंदनाची झाडे लांबवले होते.

नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात एका घराच्या आवारात मध्यरात्री 5 जण चंदन चोरी करून पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतरच काही मिनिटांतच पोलिसांनी पाठलाग करत वेगवेगळ्या ठिकाणी पळून जाणार्‍या 5 चंदन चोरांना ताब्यात घेतलंय.

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close