इतक्या लवकरच घोटाळा !,असं वाटलं नव्हतं -राज ठाकरे

June 26, 2015 8:47 PM0 commentsViews:

raj thackery on pankaja munde326 जून : ज्याचे त्याचे अच्छे दिन आले आहे पण, इतक्या लवकर हे घोटाळ्यात सापडतील असं वाटलं नव्हतं अशा शेलक्या शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चिक्की घोटाळ्याचा समाचार घेतला. तसंच 14 वर्षांचे भूके सत्तेत आले आहेत तर हातपाय मारतीलच अशा खोचक टोलाही त्यांनी लगावला. ते सिंधुदुर्गात बोलत होते.

महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्यात 206 कोटींचा खरेदी घोटाळा समोर आल्यामुळे फडणवीस सरकाराची चांगलीच नाचक्की झालीये. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पंकजा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलीये.पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजांची पाठराखण केलीये. या खरेदी घोटाळ्याची आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. 14 वर्षं सत्तेपासून दूर असलेले, भुकेलेले सत्तेत आलेत, त्यामुळे ते असे हातपाय मारणारच. इतक्या कमी वेळेत इतका मोठा भ्रष्टाचार करतील असं वाटलं नव्हतं असं राज ठाकरे म्हणाले. तसंच यांना कुणी राजीनामा मागितला तर हे देणार नाही. जे आघाडीच्या मंत्र्यांनी धोरणं आखली होती तीच हे पुढे नेत आहे. आणि तसेच पुढे जातील असं वाटतंय अशी टीकाही राज यांनी केली.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close